नाशिक जिल्ह्यात अजून महिनाभर पाणी कपात सुरू राहणार; महापालिका आयुक्त
नाशिक : नाशिक जिल्ह्यात आठ दिवसात पावसानं हजेरी लावल्यानं पाणी कपातीच्या संकटातून नाशिककरांना दिलासा मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, अजून एक महिनाभर पाणी कपात सुरु राहणार असल्याचं महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सध्यातरी नाशिककरांना दिलासा मिळणार नाही.
नाशिक जिल्ह्यात पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने पाणी कपात पुढील महिनाभर कायम राहणार असल्याचा खुलासा महापालिका आयुक्तांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्यानं पाणी कपात रद्द होईल, अशा चर्चा होत होत्या. सध्या शहरात दर गुरुवारी पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. गंगापूर धरणात आतापर्यंत फक्त 58 टक्केच पाणीसाठा झाला आहे.