रश्मी ठाकरेंविरोधात नाशिकमध्ये भाजपाची पोलिसांत तक्रार

Connect With Us

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान आणि राणेंच अटक प्रकरणामुळे आता शिवसेना  आणि भाजपमध्ये  तक्रार युद्ध पेटले आहे. नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी सामनाच्या संपादकांविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांवर केलेलं आक्षेपार्ह विधान आणि त्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेली अटक नाशिकमधील स्थानिक पातळीवर शिवसेना-भाजपममध्ये चांगलीच जुपली , या घटनाक्रमाने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सेना, भाजपच्या कार्यालयात मात्र नेहमीप्रमाणे शांततेचे वातावरण होते. कार्यकर्त्यांची गर्दी ओसरली. निवडक पदाधिकारी, कार्यकर्ते उफाळलेल्या संघर्षावर मंथन करीत पुढील रणनीती आखत होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून दोन्ही ठिकाणी पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.

असं असतानाच बुधवारी भाजपाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच सामनाच्या संपादिका आणि उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि युवासेनेचे अध्यक्ष वरुण देसाईंविरोधात वेगवेगळ्या कारणांसाठी तक्रारी दाखल करण्यात आल्यात. यासंदर्भातील वृत्त एका वृत्तसंस्थेन दिलं आहे.

दरम्यान, सायबर पोलीस स्थानकामध्ये आता उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि वरुन देसाईंविरोधात तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिलाय. भाजपाच्या वतीने तीन जणांनी या तक्रारी दाखल केल्या आहेत. पाहिली तक्रार ऋषिकेश अहेर यांनी मुख्यमंत्री आणि वरुण देसाईंविरोधात दाखल केलीय.. देसाई यांनी मुंबईमधील राणेंच्या घऱाबाहेर आंदोलन केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर देसाई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. याचं फेसबुकवरुन लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आल्याने आयपीसी कलम १५३ (अ), १०७ आणि २१२ सहीत सायबर गुन्ह्यांखाली तक्रार दाखल करुन घेण्यात यावी असं म्हटलं आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 


Connect With Us