नाशिकमध्ये सातपूर भाजपा मंडल अध्यक्षाची हत्या
नाशिक : नाशिकमध्ये सातपूर भाजपा मंडल अध्यक्षाची हत्या असून शहरात एकच खळबळ माजली आहे. सातपूर भाजपा मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या झाली असून भाजपाने आक्रमक झाले आहे. राजकीय पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने अमोल इघे यांना शुक्रवारी सकाळी फोन करून बाहेर बोलावलं. यानंतर त्याने धारधार शस्त्राने अमोल इघे यांच्यावर वार करत हत्या केली. राजकीय पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची शक्यता पोलीस व्यक्त करत आहेत, दरम्यान दिवसाढवळ्या नेत्याची हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ माजली आहे.
दरम्यान,कार्यकर्त्यांनी सातपूर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडून कडक कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/