राज कुंद्रा प्रकरण : मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय

Connect With Us

मुंबई: पॉर्नची निर्मिती तसंच मोबाइल अॅपच्या माध्यमातून त्या प्रसिद्ध केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती  राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राने ‘हॉटशॉट्स’ अॅप डेव्हलप करण्यासाठी एक कंपनी सुरु होती. या अॅपच्या माध्यमातून पॉर्नोग्राफी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

पॉर्नोग्राफी प्रकरणाचा तपास करणाऱ्या क्राइम ब्रांचने विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज कुंद्रा या प्रकरणात मुख्य आरोपी असून यापुढे एसआयटी संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात सहभागी असणाऱ्यांची संख्या वाढत चालत असल्याने क्राइम ब्रांचने तपासाची व्याप्ती वाढवली आहे. एसीपी दर्जाचा अधिकारी या तपासाचं नेतृत्व करणार असून आतापर्यंत दाखल सर्व गुन्ह्यांचा तपास केला जाणार आहे.

नव्याने स्थापन केलेली एसआयटी पॉर्नोग्राफी प्रकरणात दाखल झालेले सर्व एफआयआर हाताळणार आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात वेगवेगळे एफआयआर, तक्रारी, अनेक पीडित आणि आरोपी असल्यानेच एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता कोणीही आणि कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सर्व तक्रारी एसआयटीकडून हाताळल्या जाणार आहेत.

आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

.


Connect With Us