तुम्हाला माहीत आहे का? भारताबरोबरच ‘या’ देशांचाही स्वातंत्रदिन १५ ऑगस्टच

Connect With Us

भारताला ब्रिटीशांच्या गुलामगिरितून १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र मिळाले आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताची ओळख निर्माण झाली. १५ ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु तुम्हाला माहीत आहे का भारताबरोबरच 15 ऑगस्टच स्वातंत्र्य दिन असणारे जगात आणखीही काही देश आहेत.

उत्तर कोरिया आणि द.कोरिया या दोन्ही देशांना जपानपासून याच दिवशी स्वातंत्र मिळाले आहे. १९४५ मध्ये अमेरिका आणि सोविएत सेनांनी कोरियात चढाई करून ३५ वर्षापासून असलेला जपानी कब्जा संपुष्टात आणला आणि कोरिया स्वतंत्र राष्ट्र झाले. १९४८ मध्ये या देशाची फाळणी होऊन सोव्हिएत समर्थक उत्तर कोरिया आणि अमेरिका समर्थक दक्षिण कोरिया अशी विभागणी झाली.

लिन्टेस्टेन हा जगातील छोट्या देशांपैकी एक देश. १८६६ मध्येच त्याला जर्मन रुलर्स पासून सुटका मिळाली पण त्यांचा स्वातंत्र दिवस १५ ऑगस्ट १९४० पासून साजरा होऊ लागला.

बहारीन हा देश दिल्मुन संस्कृतीची प्राचीन भूमी मानला जातो. १५ ऑगस्ट १९७१ मध्ये या देशाने ब्रिटीशांशी लढून स्वातंत्र मिळविले. १९ व्या शतकात ब्रिटिशांच्या पूर्वी बहारीन वर अरब आणि पोर्तुगाल सह अनेक देशांनी राज्य केले आहे.

द डेमोक्राटिक रिपब्लिक ऑफ कांगो १५ ऑगस्ट १९६० मध्ये फ्रांस शासकांच्या ताब्यातून स्वतंत्र झाला. मध्य आफ्रिकेतील या देशाला फ्रांसने गुलाम बनविले होते. सुरवातीला याचे नाव फ्रान्सिसी कांगो होते ते १९०३ मध्ये मध्य कांगो असे झाले होते.

आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us