निवडणूक आयोगाची वेबसाइट हॅक केल्याप्रकरणी एकाला अटक

Connect With Us

निवडणूक आयोगाच्या (ECI) वेबसाइट हॅक प्रकरणी आरोपी युवकाला अटक करण्यात आली आहे. अटकपूर्वी आरोपीने १०,००० हून अधिक बनावट मतदार ओळखपत्रे तयार केली होती. उत्तर प्रदेशमध्ये सहारनपूर पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. सहारनपूरचे एसएसपी एस चेनप्पा म्हणाले की, आरोपी विपुल सैनीने नकुड भागातील त्याच्या कम्प्युटरच्या दुकानातून हॅकिंग केले.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी विपुल सैनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी वापरलेल्या पासवर्डद्वारे निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर लॉग इन करत असे. याबाबत आयोगाला संशय आला आणि तपास यंत्रणांना माहिती दिली. यंत्रणांच्या तपासादरम्यान सैनी संशयाच्या भोवऱ्यात आला आणि त्यांनी सहारनपूर पोलिसांना सैनीबद्दल माहिती दिली.

दरम्यान, एसएसपी चेनप्पा म्हणाले, “चौकशीदरम्यान सैनीने सांगितले की, तो मध्य प्रदेशातील हरदा येथील रहिवासी अरमान मलिक यांच्या सांगण्यावरून काम करत होता आणि त्याने तीन महिन्यांत १०,००० हून अधिक मतदार ओळखपत्रे बनवली होती. सायबर सेल आणि सहारनपूर गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने गुरुवारी सैनीला अटक केली.’

आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

.


Connect With Us