अखेर भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव, ‘ या’ राज्यात सापडले २ रुग्ण!

Connect With Us

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या ओमायक्रोन या नव्या विषाणूने शिरकाव केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. ओमायक्रोनने बाधित असलेले दोन्ही रुग्ण हे भारतीय असून ते कर्नाटकातले रहिवासी आहे.

कर्नाटकात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोन जणांना ओमायक्रोनची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय तपासातून समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. कर्नाटकात 66 आणि 46 वर्षांच्या दोन व्यक्तींना ओमायक्रोन विषाणूची लागण झाली आहे.

आत्तापर्यंत एकूण २९ देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याचं देखील सांगितलं. त्यामुळे ओमायक्रॉन आता हळूहळू हातपाय पसरायला लागल्याचं चित्र दिसी लागलं आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us