डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्राला भरणार हुडहूडी ; हवामान विभागाची माहिती

Connect With Us

मुंबई : डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात थंडी जाणवेल, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. हवामानात उल्लेखनीय बदल होणार असून या बदलानुसार, २० डिसेंबरनंतर उत्तरेकडील पश्चिमी प्रकोप, अति उच्च दाबाचे पट्टे; अशा हवामान बदलाचा महाराष्ट्रावर परिणाम होईल.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वांत कमी किमान तापमान मालेगाव येथे १३.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. ८ ते ११ डिसेंबरदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील, अशी शक्यता वर्तविली आहे.

तसेच, हवामान तज्ञांनी संगितले की, पुढील १०-१५ दिवस पाऊस नाही, ढगाळ वातावरण नाही, थंडीत वाढ होणार, धुक्याचेही प्रमाण कमी असणार आहे. सध्या कोणतीही हवामान प्रणाली कार्यरत नाही. त्यामुळे आकाश निरभ्र राहील. डिसेंबर आणि जानेवारीच्या काही दिवसांत थंडी वाढेल. दक्षिणेकडील राज्यांत हवामान बदल झाल्यास त्याचा राज्यावर काही प्रमाणात का होईना परिणाम होण्याची शक्यता आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


Connect With Us