दु:खद ! देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं तामिळनाडूच्या हेलिकॉप्टर अपघातात निधन

Connect With Us

तामिळनाडूत झालेल्या भीषण दुर्घटनेत देशाचे चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपीन रावत  यांचं निधन झालं आहे. भारतीय वायूदलाने ट्विट करत याबबात माहिती दिली आहे. जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिया रावत यांच्यासह विमानात असलेल्या आणखी 11 जणांचं दुर्देवी निधन झालं आहे. या निधनामुळे देशाचं खूप मोठं नुकसान झालं आहे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय हवाई दलाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूच्या कोइम्बतूर आणि सुलूरदरम्यानच्या कुन्नूर या ठिकाणी हा अपघात झाला. इथल्या निलगिरीच्या डोंगळाळ प्रदेशामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जण प्रवास करत होते. यात लष्कराच्या काही वरीष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत हे या हेलिकॉप्टरमध्ये होते.  या अपघातात रावत यांच्या पत्नीचंही निधन झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, घटनास्थळावरून एकूण ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उरलेल्या ३ जणांची प्रकृती गंभीर सांगितली जात होती. आता त्यात अजून दोन जणांचा मृत्यू झाला असून हवाई दलाच्या एका अधिकाऱ्यावर उपचार सुरू आहेत. जखमी झालेल्या व्यक्ती ८० टक्क्यांहून जास्त प्रमाणात भाजल्याची देखील माहिती समोर आली होती. त्यामध्ये जनरल बिपिन रावत यांच्यावर देखील उपचार सुरू होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचं निधन झाल्याचं अखेर जाहीर करण्यात आलं आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


Connect With Us