Agriculture Bill : शेतकऱ्यांच्या ‘भारत बंदला’ महाविकास आघाडीचा पाठिंबा
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने २७ सप्टेंबरला ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे. शेती सुधारणेसंबंधी तीन सुधारणा कायदे मंजूर होऊन वर्षभरापेक्षा जास्त काळ झाला आहे. या कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या वर्षभरापासून राजधानीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. आंदोलनस्थळी देशभरातून आलेले शेतकरी ठिय्या मांडून आहेत. शिवाय वेगवेगळ्या राज्यांतही शेतकरी विरोध करीत आहेत.
दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाच्या या ‘भारत बंद’ ला महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे-पाटील यांनी दिली. तसेच, जोपर्यंत कृषी कायदे परत घेतले जात नाहीत तोपर्यंत सीमेवर आणि गावागावांत आंदोलन सुरूच राहील, अशी माहिती शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिली.
संयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंदच्या हाकेला अनेक शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. बंद शांततेत करण्याचे आवाहन आंदोलकांना करण्यात आले आहे. शेतकरी, कामगार आणि विद्यार्थी, प्रस्तावित कामगार कायदा, शिक्षण कायदा, वीजबिल अधिनियम आणि तिन्ही कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने बंदचे आवाहन केले आहे. कृषी कायदे मागे घेण्यात यावेत यासाठी २६ नोव्हेंबर २०२० पासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. टिकैत म्हणाले, ‘भारत बंदचे आंदोलन सरकारविरोधात आहे, लोकांच्या विरोधात नाही. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत आंदोलन असेल. जीवनावश्यक सुविधांना बंदमधून सूट देण्यात आली आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/