मनसे शहर कार्यकारिणीत मोठे फेरबदल !

Connect With Us

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या नाशिक शहर व जिल्हा संघटनेत मोठे फेरबदल जाहीर केले आहे. दिलीप दातीर यांना नाशिक शहर अध्यक्ष पद देण्यात आले आहे तर अंकुश पवार यांना नाशिक जिल्हाध्यक्ष पदावर बढती देण्यात आली आहे. अॅड. रतनकुमार ईचम यांनाही जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले आहे. तर सचिन भोसले यांना शहर समन्वयक पद देण्यात आले आहे. नूतन कार्यकारिणी जाहीर करतांना राज ठाकरेंनी नाशिक शहरातील सहाही विभाग अध्यक्षांना पदावर कायम ठेवले आहे.

आगामी नाशिक महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर,  नितीन सरदेसाई, शिरीष सावंत,  अनिल शिदोरे,  किशोर शिंदे, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, संजय नाईक, अमेय खोपकर, योगेश परुळेकर,  राकेश पेडणेकर,  योगेश खैरे, दिलीप कदम या मुंबईच्या वरिष्ठ नेत्यांनी राजगड येथे ईच्छुकांच्या बैठका घेत शाखा अध्यक्षांच्या यादीला अंतिम रूप दिले. राज ठाकरे यांचे नाशिक येथे आगमन झाल्यावर यादीला अंतिम मंजुरी घेत आज हॉटेल एसएसके सोलीटेयर येथे झालेल्या मनसे पदाधिकारी मेळाव्यात नूतन पदाधिकाऱ्यांच्या नावांसह सर्व १२२ नवनियुक्त शाखा अध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली.

या प्रसंगी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अॅड. रतनकुमार ईचम व अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर,  नगरसेवक सलीम  शेख, नगरसेवक योगेश शेवरे, शहर समन्वयक सचिन भोसले, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, नितीन साळवे, भाऊसाहेब निमसे, विक्रम कदम, रामदास दातीर व योगेश लभडे यांच्यासह मनसे शहर कार्यकारीणी व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us