भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनसेतर्फे विनम्र अभिवादन
नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
भारतरत्न भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर हे बहुआयामी व्यक्तिमत्वाचे स्वामी होते. न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, प्रखर समाज सुधारक असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांनी अश्पृश्यता, जाती व्यवस्था सारख्या सामाजिक कुप्रथांविरुद्ध आपल्या लेखणी व वक्तृत्वातून मोठी जन जागृती घडवून आणली. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री, भारतीय राज्यघटनेचे जनक, भारतीय प्रजासत्ताकाच्या शिल्पकारांपैकी एक होते असे प्रतिपादन या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अंकुश पवार व शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी केले.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष डॉ. मनोज चव्हाण, सरचिटणीस संदीप देशपांडे, कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संतोष धुरी, अध्यक्ष नंदकिशोर तळावडेकर, मनसे नाशिक जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, शहर समन्वयक सचिन भोसले, कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष व नगरसेवक सलिम (मामा) शेख, नगरसेवक योगेश शेवरे, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, नितीन साळवे, भाऊसाहेब निमसे, विक्रम कदम, रामदास दातीर, योगेश लभडे, खंडू बोडके, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदिप भवर, कामगार सेनेचे उपचिटणीस तुषार जगताप, विजय रणाते, अमित गांगुर्डे, संजय देवरे, सुरक्षा रक्षक सेनेचे चिटणीस कैलास मोरे, उपचिटणीस अर्जुन वेताळ, पंकज दातीर, पराग भुसारी, स्वप्नील ओढाणे, दिपक डोके,योगेश वाघचौरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा