नाशिकमध्ये 27 सप्टेंबरपासून ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन
नाशिकः नाशिक जिल्ह्यात सध्या 227 नोकरीच्या संधी असून, त्यासाठी येत्या 27 सप्टेंबरपासून ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनामुळे गेल्या काही दिवसांमध्ये अनेकांच्या नोकऱ्या व रोजगार गेले आहेत. सध्या कोरोना रुग्णही आटोक्यात आहेत. त्यामुळे कंपन्यांचे गाडे रुळावर आले असून, पुन्हा एकदा नोकर भरती सुरू झाली आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांना अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राकडून या दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील उद्योग समूह सहभागी होत आहेत. नाशिकच्या डब्ल्यूएनएस ग्लोबस सर्व्हिसेसमध्ये अप्रेंटिसच्या 10 जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी कुठल्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. नाशिकच्याच श्रद्धा मोटर इंडस्ट्री प्लांटमध्येही नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यात 2 फीटर, 8 वेल्डर आणि 1 जागा इलेक्ट्रीशियनची आहे. नाशिकच्या डाटा मॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस बी. कॉम आणि बीबीए उत्तीर्ण उमेदावारांसाठी 100 नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, तर एमबीएच्या 100 जागीही नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच इतरही काही रोजगाराच्या संधी आहेत.
अर्ज कसा भरायचा ?
ऑनलाइन रोजगार मेळाव्यातील नोकरीची संधी मिळवण्यासाठी संबंधित उमेदवाराची सेवायोजन कार्यालयामध्ये नोंदणी असणे गरजेचे आहे. ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. या वेबपोर्टलवर लॉग इन करावे. त्यानंतर जॉब फेअर टॅबरवर क्लिक करावे. यात NASHIK ONLINE JOB FAIR-6 (2021-22) या भागाची निवड करावी. या भागात उमेदवाराने आपल्या पात्रतेप्रमाणे रिक्त जागांसाठी अर्ज करावा. काही अडचण आल्यास 0253-2972121 या क्रमांकावर कार्यालय वेळेत संपर्क साधावा. रोजगार मेळाव्याच्या ऑनलाइन मुलाखतीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सेवायोजन विभागाचे सहायक आयुक्त अ. ला. तडवी यांनी केले आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/