ओमायक्रॉन : राज्यात नियमावली संदर्भात आदित्य ठाकरेंचं सूचक विधान, म्हणाले..

Connect With Us

मुंबई : राज्यात  कोरोना व्हायरसचा  ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळं सर्वांचीच चिंता वाढली आहे. दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील ओमायक्रॉन परिस्थिती संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्स यांच्यात आज रात्री होणाऱ्या बैठकीत ओमायक्रॉन आणि प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वांवर चर्चा केली जाईल, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.

लोकांनी केंद्र सरकारनं, शहरी स्थानिक पालिकांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावं, ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आम्ही केवळ विमानतळांवर, एंट्री पॉइंट्सच नाहीतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात चाचणी करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दर आठवड्याला कॉर्पोरेट कार्यालयांनी RT PCR करावं असं म्हणत ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही, त्यांनी लसीकरण करणं आवश्यक अस  यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.

तसेच, अधिक निर्बंध घालण्यासाठी आम्ही आता दोन ते तीन दिवस निरीक्षण करू, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. मात्र घाबरण्याची गरज नाही. पण आरोग्याबाबत चिंता असावी, असंही ते  म्हणाले. तसेच, सरकारनं नियम कडक केले आहेत. सरकारकडून अतिरिक्त नियम लागू करण्यात आले आहेत. आम्ही वेळेवर पुनरावलोकन करत राहू, असं त्यांनी सांगितलं आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


Connect With Us