ईअरफोन ठरला जीवघेणा गाणी ऐकताना कानातच फुटले, तरुणाचा जागेवर मृत्यू

Connect With Us

नवी दिल्ली : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ईअरफोन एका तरुणासाठी जीवघेणा ठरला आहे. गाणी ऐकताना कानातच ईअरफोनचा ब्लास्ट झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. यानंतर तरुणाच्या कानातून रक्त वाहून लागले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यात उदयपुरिया  गावात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. राकेश नागर (Rakesh Nagar) असं 28 वर्षीय मृत तरूणाचं नाव आहे. राकेश नेहमीप्रमाणे कानात ईअरफोन घालून गाणी ऐकत होता. तेवढ्यात त्याच्या कानात ईअरफोन स्फोट झाला. यात ईअरफोनचा स्पीकर फुटला. ईअरफोनच्या स्फोटामुळे मोठा आवाजही झाला. त्यानंतर राकेशच्या कानातून रक्त यायला लागलं. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं.

राकेश नागरचं याच वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न झालं होतं. त्याच्या अशा अचानक मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तसेच ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा तो एकटाच घरी होता. राकेश स्पर्धा परीक्षेची देखील तयार करत असल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कानामध्ये ईअरफोनचा स्फोट झाल्याने मोठा आवाज आला. त्यामुळे तरुणाला कार्डियक अरेस्ट आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ईअरफोनचा अशा प्रकारे स्फोट झाल्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका न्यूज वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

 


Connect With Us

One thought on “ईअरफोन ठरला जीवघेणा गाणी ऐकताना कानातच फुटले, तरुणाचा जागेवर मृत्यू

Comments are closed.