दिलासादायक ! पेट्रोल- डिझेलच्या दरात घट
नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये आता काही प्रमाणात घट झाली असल्याची दिलासादायक बातमी मिळत आहे. गेल्या काही दिवसांत सतत होणाऱ्या दरवाढीच्या तुलनेत आज झालेली घट सकारात्मक आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, राजधानी दिल्लीत पेट्रोलचे भाव १५ पैश्यांनी कमी झालं असून आता १०१.१९ रुपये प्रतिलीटर दराने तिथे पेट्रोल मिळत आहे. तर डिझेलच्या किमतीतही १५ पैश्याची घट झाली असून डिझेलचा दर आता ८८.६२ टक्के झाला आहे. मुंबईतच्या पेट्रोलच्या दरात १३ पैश्यांची घट झाली असून सध्याचा दर १०७.२६ रुपये प्रतिलीटर आहे. तर डिझेल ९६.१९ रुपये प्रतिलीटर आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल कंपन्यांचे दर जरी स्थिर असले तरी भारतातल्या सरकारी तेल कंपन्यांनी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला तेलाच्या किमतीत काहीशी घट केली आहे.
तसेच, इंधनात झालेली दरवाढ व महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले धोरण पाहता आता विद्युत वाहनांकडे खरेदीदारांचा कल वाढत आहे. जानेवारी ते जुलै या कालावधीत २७८ वाहनांची नोंद नवी मुंबई उपप्रादेशिक कार्यालयात झाली आहे. यात १५० बस असून ५८ कार व ७० दुचाकींचा समावेश आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/