सोनगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त ग्रामस्थांनी केले अभिवादन

Connect With Us

आज दि (6 सप्टेंबर ) रोजी तिथीनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी सोनगाव येथे संपन्न झाली. सर्वप्रथम छञपती शिवराय,रामभक्त हनुमान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी, श्री विठ्ठल रुखमाईना पुष्ष हार अर्पण करुन ,दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या  मंदिरासाठी जागा देणार्‍या दानशुर श्री भाउसाहेब गाडे याचा सत्कार करण्यात आला. तसेच, सोनगांव ग्रामपंचायत सर्व नवनिर्वाचित संरपच व सदस्यांचाचा सत्कार करण्यात आला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर श्री ,मुरादे साहेब,सुदाम गावले,शेलार सर,सौरभ गावले यांनी विचार माडले कार्यक्रमाचे सुञसंचालन पुण्यश्लोक बहुउद्योशिय संस्था, महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष श्री भाउसाहेब ओहळ यांनी केले.  उपस्थितीचे आभार श्री अशोक अण्णा चिखले यांनी मानले. या मोठ्या प्रमाणात सोनगांव ग्रामस्य व समाजबाधव उपस्थित होत. दरम्यान,  कार्यक्रमाचा शेवट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आरती करुन करण्यात आला.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us