पुणे विद्यापीठाचा शुल्क कपातीचा निर्णय!

Connect With Us

पुणे :  कोरोनाच्या परिस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थी आणि पालकांना दिलासा देण्याचा दिला आहे. पुणे विद्यापीठाने 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी शुल्क कपातीचा निर्णय घेतला आहे.(Savitribai Phule Pune University)

विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालये आणि विद्यापीठातल्या अभ्यासक्रमांच्या शुल्कात 25 ते 100 टक्क्यांपर्यंत शुल्क कपात करण्यात आली आहे. यासोबतच कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क माफ केलं जाणार आहे. या निर्णयामुळे विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या पदवी, पदवीका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या साधारण सात लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालयांतल्या विद्यार्थ्यांचं शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुणे विद्यापीठात यासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली. या समितीने कुलगुरूंकडे शुल्क कपात करण्याचा अहवाल सादर केला. त्यानंतर कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी हा अहवाल स्वीकारला आहे आणि त्यातल्या शिफारसींना मान्यता दिली आहे.

किती टक्के शुल्क कपात

औद्योगिक भेटी – 100 टक्के
महाविद्यालय मासिक – 100 टक्के
सुरक्षा डिपॉझिट – 100 टक्के
प्रयोगशाळा डिपॉझिट – 100 टक्के
इतर डिपॉझिट – 100टक्के
आरोग्य तपासणी – 100 टक्के
आपत्ती व्यवस्थापन शुल्क – 100 टक्के
अश्वमेध – 100 टक्के
विद्यार्थी कल्याण निधी – 75 टक्के
इतर शैक्षणिक उपक्रम – 50 टक्के
ग्रंथालय – 50 टक्के
प्रयोगशाळा – 50 टक्के
जिमखाना – 50टक्के
संगणक कक्ष – 50 टक्के
परीक्षा शुल्क – 25 टक्के
विकास निधी – 25टक्के

 


Connect With Us