पंतप्रधान मोदी दिवसातून एकदाच जेवतात; यामागील कारणाचा त्यांनी स्वतःच केला खुलासा
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दिवसभरामध्ये एकदाच जेवतात. ही माहिती पंतप्रधान मोदींनीच दिली आहे. दिवसातून एकदाच जेवण्यामागील कारणाचा त्यांची खुलासा केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी टोकियो ऑलिम्पिकमधील विजेत्या खेळाडूंना आपल्या निवासस्थानी जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. त्यावेळी त्यांनी आपल्या खाण्याबाबत हा खुलासा केला.ऑलिम्पिकमध्ये भालाफेक करत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्रासोबत ते गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांनी त्याला चूरमा घ्यायला दिलं. नीरजने पीएम मोदींनाही आपल्यासोबत चूरमा खाण्याची विनंती केली. पण मोदींनी त्याला नकार दिला. पंतप्रधान मोदी यांनी आपण दिवसातून एकच वेळ जेवत असल्याचं सांगितलं आणि यामागील कारणही त्यांनी सांगितलं. आता चातुर्मास आहे आणि यावेळी मी दिवसभरात फक्त एकच वेळ जेवतो, असं ते म्हणाले.
चातुर्मास हा जैन धर्मातील एक पर्व आहे. या कालावधीत धार्मिक कार्य केली जातात. तसंच काही पदार्थ खाणं टाळलं जातं. शिवाय या कालावधीतल वातावरण पाहता लोक दिवसभरात एकाच वेळचं जेवण करतात. पंतप्रधान मोदीसुद्धा याचा अवलंब करतात.
सध्या चातुर्मास सुरु असून प्रामुख्याने जैन धर्मातील लोकांमध्ये या कालावधीत खाण्यासंदर्भातील कठोर नियम पाळले जातात. चातुर्मासामध्ये हिंदू धर्मामध्येही अनेक धार्मिक विधी केले जातात. या कालावधीमध्ये शरीरामधील दाहकता वाढवणाऱ्या, पित्त वाढवणाऱ्या भाज्या खाल्ल्या जात नाहीत. अनेकजण पावसाळी वातावरण आणि सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन दिवसातून एकच वेळ जेवण घेतात. पंतप्रधान मोदीसुद्धा चातुर्मासामध्ये एकाच वेळेचं जेवण करतात. मोदींनी नीरजला हे सांगतानाची दृष्य कार्यक्रमाच्या व्हिडीओमध्ये आहेत.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/