खासदार उदयनराजे कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णालयात उपचार सुरू

Connect With Us

पुणे : भाजपचे, खासदार उदयनराजे भोसले यांना कोरोनाचा संसर्ग झाला. चार दिवसांपूर्वीच ते दिल्लीहून परतले आणि त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला होता.

चार दिवसांपूर्वीच उदयनराजे भोसले यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. उदयनराजे भोसले यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिल्लीहून परतल्यानंतर उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली त्यानंतर त्यांनी आपली कोविड टेस्ट केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. उदयनराजे भोसले यांची प्रकृती स्थिर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने आणि बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us