‘या’ तारखेपासून राज्यात तमाशा सादरीकरणासाठी परवानगी, सुरेखा पुणेकरांनी मानले आभार

Connect With Us

पुणे  : कोरोनाच्या निर्बंधांमुळे तमाशा कलावंतही अडचणीत आले होते. मात्र, आता या कलावंताना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात 1 फेब्रुवारीपासून तमाशा सादरीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. लावणी सम्राञी सुरेखा पुणेकर यांनी तमाशा सादरीकरणाला परवानगी दिल्याबद्दल राज्य सरकारचे आणि राष्ट्रवादीचे जाहीर आभार मानले आहेत. या निर्णयामुळे कलाकारांना दिलासा मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, पुणेकर यांनी आपला एक व्हिडिओ शेअर करत तमाशा कलावंतना 1 कोटींची मदत केल्याबद्दलही आभार मानले.

सुरेखा पुणेकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून कलाकारांच्या व्यथाही मांडल्या आहेत. त्या म्हणाल्या की< गेल्या तीन वर्षांपासून कोरोनामुळे असलेल्या निर्बंधांमुळे कार्यक्रम बंद असल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात आता राज्य सरकारने तमाशा सादरीकरणाला १ फेब्रुवारीपासून परवानगी दिली आहे. त्यामुळे, यात्रांमध्ये लावणी तसंच तमाशाचं आयोजन करा आणि कलावंतांचे कार्यक्रम ठेवा, तसंच त्यांना सहकार्य करा, असं आवाहन सुरेखा पुणेकर यांनी नागरिकांना केलं आहे. यासोबतच त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचेही आभार मानले आहेत.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 


Connect With Us