भारतीयांचं आयुर्मान नऊ वर्षांनी होणार कमी; महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक

Connect With Us

शिकागो विद्यापीठातील ऊर्जा धोरण संस्थेने (ईपीआयसी) बुधवारी यासंदर्भात एक अहवाल जारी केला आहे

नवी दिल्ली : येणार्‍या काळात वायू प्रदूषणामुळे सुमारे ४०% भारतीयांचे आयुर्मान नऊ वर्षांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. शिकागो विद्यापीठातील ऊर्जा धोरण संस्थेने (ईपीआयसी) बुधवारी यासंदर्भात एक अहवाल जारी केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, “नवी दिल्लीसह मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात राहणारे ४८ कोटी लोक मोठ्या प्रमाणात प्रदुषित भागांमध्ये राहतात. तसेच, गेल्या काही वर्षात भारताच्या वायू प्रदूषणाच्या पातळीचा भौगोलिकदृष्ट्या विस्तार झाला असून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये हवेची गुणवत्ता लक्षणीय खराब झाली आहे.”

भौगोलिक स्थिती विचारात घेतल्यास वायू प्रदूषणाचं प्रमाण वेगानं वाढत असल्याची माहिती अहवालात आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील हवेचा दर्जा वेगानं घसरत असल्याचं अहवाल सांगतो.

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी २०१९ मध्ये स्वच्छ हवा अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानाचं अहवालातून कौतुक करण्यात आलं आहे. या अभियानाच्या अंतर्गत ठेवण्यात आलेली लक्ष्य पूर्ण झाल्यास देशातील नागरिकांचं आयुमान १.७ वर्षांनी, तर दिल्लीतल्या नागरिकांचं आयुष्य ३.१ वर्षांनी वाढेल. देशातील इतर शहरांच्या तुलनेत दिल्लीतल्या प्रदूषणाचं प्रमाण जास्त आहे.

औद्योगिक उत्सर्जन आणि वाहनातून होणारं प्रदूषण रोखण्यासाठी स्वच्छ हवा अभियान सुरू करण्यात आलं. वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनाचा वापर कमी करण्याच्या उद्देशानं अभियानाची सुरुवात करण्यात आली. २०२४ पर्यंत देशातील १०२ शहरांतील प्रदूषण २० ते ३० टक्के कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 


Connect With Us