आधी बलात्कार, मग निर्घृण हत्या; अखेर पीडितेला मिळाला न्याय ! आरोपीला मिळणार फाशीची शिक्षा
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमध्ये ४ ऑगस्टला अंगावर काटा आणणारी घटना घडली. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची अत्यंत निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला अखेर न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. स्त्रीसोबत झालेला असा अपराध कोणत्याही धर्म किंवा संस्कृतीला मान्य नाही, असं या खटल्याचा निकाल देताना विशेष न्यायाधीश डॉ. पल्लवी अग्रवाल यांनी म्हटलं. आरोपी अशोक कुमारला फाशीसोबतच १.४० लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावण्यात आला आहे.
घटनेचा तपास करणारे पोलीस अधिकारी आरोपीनं केलेलं कृत्य पाहून हादरले होते. आरोपी अशोक कुमार ने एका अल्पवयीन लहान मुलीवर बलात्कार करून त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केली. त्यानं हाडं मोडून मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत टाकला आणि मग ती पिशवी फेकून दिली.
पोलिसांनी त्याच रात्री आरोपीला अटक केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत आरोपीची रवानगी कोठडीत केली. १८ सप्टेंबर २०२० रोजी पोलिसांनी न्यायालया आरोपपत्र दाखल केलं. घटनास्थळी मिळालेली प्लास्टिकची पिशवी, शवविच्छेदन अहवाल, मृत मुलीच्या बहिणीची साक्ष, मृत मुलीचा स्लाईड अहवाल या सर्व बाबी खटल्यात महत्त्वाच्या ठरल्या. पुरावे आणि साक्षींच्या आधारे न्यायालयानं अशोक कुमारला फाशीची शिक्षा सुनावली.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/