राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर ठरले धुळे
धुळे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात आटोक्यात आल्याने , त्या अनुषंगाने संपूर्ण व्यवहार पूर्वरत होण्यासाठी राज्यशासनाने कोरोना निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केलीय.
दरम्यान ,यात अजून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. धुळे शहर राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर झाले आहे. धुळे शहरात २५ जुलै पासून एकही कोरोना रुग्ण नाही. तसेच ३ ऑगस्टपासून एकही कोरोना रुग्णसापडला नाही. यामुळे धुळे शहर कोरोनामुक्त जाहीर झाले आहे. कोरोनामुक्त होणारे धुळे हे राज्यातील पहिले शहर ठरले आहे. योग्य नियोजन, कडक लॉकडाऊन आणि लसीकरणाचं चांगलं प्रमाण, यामुळे शहर कोरोनामुक्त झालं आहे. तरीही पालिकेनं शहरात कोरोना चाचण्या सुरुच ठेवल्या आहेत.
तसेच भंडारा जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जून महिन्यापासून कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात आली होती. जुलै महिन्यातर रुग्ण संख्या सिंगल डिजिटमध्ये आली होती. त्यातही तब्बल वीस दिवस एकही रुग्ण आढळून आला नाही. तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले. गत आठवड्यापासून जिल्ह्यात मोहाडी तालुक्यात एकमेव ॲक्टिव्ह रुग्ण होता.
दरम्यान, शुक्रवारी ५७८ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात एकही पाॅझिटिव्ह आढळून आला नाही. तर मोहाडी तालुक्यातील एकमेव रुग्ण कोरोनामुक्त झाला. राज्यात सर्वप्रथम कोरोनामुक्त होणारा भंडारा हा एकमेव जिल्हा असावा.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7