CoronaVaccine : १२ ते १७ वयोगटातील मुलांना ऑक्टोबरपासून मिळणार लस
नवी दिल्ली : सध्या देशात १८ वर्षावरील सर्वांसाठी लसीकरण सुरू आहे. दरम्यान, आता लवकरच देशातील १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून करोना लस मिळणार आहे. देशात या वयोगटातील मुलांची संख्या १२ कोटींपर्यंत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही लस सर्वप्रथम गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांना दिली जाईल. DCGI कडून यासाठीची परवानगी मिळली असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुलांना झायडस कॅडिला ही लस देण्यात येणार आहे.
दरम्यान, सरकारच्या कोविड१९ वर्किंग ग्रुप कमिटीचे प्रमुख डॉ. एनके अरोरा यांनी सांगितलं कि, भारतात १२ ते १७ वयोगटातील सुमारे १२ कोटी मुले आहेत, त्यापैकी १ टक्क्यांपेक्षा कमी मुलांना आरोग्य समस्या असू शकतात असा अंदाज आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांना गंभीर आरोग्यविषयक गुंतागुंत किंवा विषाणूमुळे मृत्यू होण्याच शक्यता नाही.
उलट, त्यांच्या पालकांमध्ये १० ते १५ पटीने आरोग्यविषयक गुंतागुंत होण्याची शक्यता असून शकते जे साधारणतः १८ ते ४५ वयोगटातील आहेत. म्हणूनच, आम्ही मुलांना लसीकरण सुरू करण्यापूर्वी या (१८ ते ४५) गटाचे लसीकरण करण्यास प्राध्यान्य देत आहोत.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/