मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, विविध चर्चांना उधाण
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी केलले वादग्रस्त विधान आणि राणेंच अटक प्रकरण यावरून महाराष्ट्रातले राजकारण चांगलेच ढवळून निघाले, भाजप- शिवसेना मध्ये चांगलीच जुंपलेली बघायला मिळाली, दरम्यान यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं समजतंय. ओबीसी आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक आज सह्याद्री अतिथिगृहात पार पडली. या बैठकीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये ही वेगळी भेटी झाली आहे. या वेगळ्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आधी फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्येच चर्चा झाली. सेना भाजपा वाद सुरू असतानाच दोन मोठ्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानं तर्कवितर्कांना एकच उधाण आलं आहे.
आज सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार,अनिल परब, अशोक चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/