पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचा मोठा निर्णय
मुंबई : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सध्या आपत्तीग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सांगलीतल्या पूरग्रस्त भागाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. त्यावेळी पवार यांनी घोषणा केली की राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदार,मंत्री आपलं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून देणार आहेत
सध्याच्या संकटात राज्य सरकार, केंद्र सरकार मदत करत आहे, राष्ट्रवादीचे सर्व आमदार,खासदार, मंत्री यांचं एक महिन्याचं मानधन देणार आहेत. महाराष्ट्रातील जनता नैसर्गिक संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करत असते. जनतेने फूल ना फुलांची पाकळी म्हणून मदत करावी. सध्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर जे संकट कोसळलं आहे त्यामध्ये जनतेने फूल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करावी,असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.