सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर

Connect With Us

मुंबई : बारावीचा निकाल जाहीर होऊन बराच कालावधी झाला आहे. त्यापुर्वीच अनेक विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी (सीईटी)अर्ज केला होता.

दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या यासाठीच्या सर्व सीईटी परीक्षा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान होतील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मंगळवारी सांगितले. सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी राज्यभरातील ८ लाख ५५ हजार ८७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यासाठी राज्यभरात २२६ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

बारावीचा निकाल जाहीर होऊन बरेच दिवस उलटूनही सीईटीच्या तारखा जाहीर न झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, पुढील काही दिवसात सीईटीच्या तारखा प्रसिद्ध होतील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यापुर्वी सांगितले होते. त्यानुसार आज तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 


Connect With Us