मोठी बातमी ! राज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी

Connect With Us

राज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी गेला असल्याची माहिती समोर येत आहे. एका तरुणाचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. पुण्यामध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. पुण्यात राहणाऱ्या सोलापूरच्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या तरूणाच्या मृत्यूमुळे मोठी खळबळ माजली आहे.

पुण्यात सध्या गुलियन बॅरे सिंड्रोमचे थैमान सुरू असून त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या दरम्यान टेन्शन वाढवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. याच गुलियन बॅरे सिंड्रोममुळे पुण्यातील एका तरूणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील DSK विश्व मध्ये राहणाऱ्या तरुणाचा GBS ची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. तो तरूण मूळचा सोलापूरचा असल्याचे समजते. मात्र या तरूणाच्या मृत्यूमुळे मोठी खळबळ माजली आहे.

तो मूळचा सोलापूरचा होता, पण काही काळापासून पुण्यात रहात होता. या तरुणाला काही दिवसांपूर्वी गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती. GBS मुळे तब्येत खालावल्याने त्याला सोलापूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर तो तरूण बरा होऊन काहीच दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागातून बाहेरही आला होता. पण त्याला परत श्वासनाचा त्रास झाल्याने त्या तरूणाचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान पुण्यामध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 73 वर पोहचली आहे. यामधील काहींची प्रकृती गंभीर असल्याचीही माहिती समोर आली आहे. या आजारामुळे पुणे महानगर पालिका अलर्ट मोडवर असून उपाययोजना करत आहे.


Connect With Us