श्री गणेश चतुर्थी: ‘या’ शुभ मुहुर्तावर करा गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा
गपणती बाप्पाचे आगमन हा सर्वोच्च आनंदाचा दिवस असून आज अखेर हा दिवस उजाडला आहे. बाप्पांच्या आगमनासाठी सर्व जन अत्यंत उत्साहाने आपआपल्या पद्धतीने तयारी करत असतात. गणपती प्रतिमा खरेदी करण्या पासून ते बाप्पा विराजमान होतात त्या स्थानाची सजावट, पूजापाठ ते यासाठी अनेक तयारी करायची असते. परंतु याचबरोबर गणेश चतुर्थी गणपती प्रतिष्ठापनेसाठीच्या मुहूर्तालाही ही तितकेच महत्व आहे.
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. शुक्रवार, (आज )१० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. गणेश पुराणात यास विनायकी चतुर्थी असे संबोधले गेले आहे. काही पुराणांमध्ये ही तिथी महासिद्धिविनायकी चतुर्थी, वरद चतुर्थी किंवा शिवा या नावांनीही उल्लेखली गेली आहे. गणेश भक्त आणि उपासकांत भाद्रपद चतुर्थी अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या गणेश पूजनाचे, नामस्मरणाचे, आराधनेचे लवकर फळ मिळते, असे सांगितले जाते.
गणेश चतुर्थी गणपती प्रतिष्ठापनेसाठी शुभ मुहूर्त
भाद्रपद चतुर्थी प्रारंभ : गुरुवार, ०९ सप्टेंबर २०२१ रोजी रात्रौ १२ वाजून १८ मिनिटे.
भाद्रपद चतुर्थी समाप्ती : शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ रोजी रात्रौ ९ वाजून ५८ मिनिटे.
श्रीगणेशाची प्रतिष्ठापना शुक्रवार, १० सप्टेंबर रोजी सकाळी सूर्योदयापासून दुपारपर्यंत करावी, असे सांगितले जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ०६ वाजून २५ मिनिटांनी सूर्योदय आहे. या दिवशी सकाळी ११ वाजून ०३ मिनिटांपासून ते १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत राहुकाळ असल्यामुळे यादरम्यान कोणतेही शुभ कार्य करू नये, असे सांगितले जाते.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/