हैदराबाद बलात्कार प्रकरण; पीडितेची ओळख उघड केल्यामुळे,अक्षय-सलमानसह 38 सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल !
2019 साली हैदराबादमध्ये एक बलात्काराचं धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं. ज्यामध्ये 4 जणांनी एका मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर नराधमांनी तिला जिवंत जाळलं होतं. या संतापजनक घटनेनं सर्वांना धक्का बसला होता. अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवला होता. सामान्य लोकांसोबतच बॉलिवुडच्या कलाकारांनी देखील या घटनेबाबत दुःख आणि नाराजी व्यक्त केली होती. मात्र, दु: ख व्यक्त करताना काही सेलिब्रिटींनी पीडित मुलीची ओळख आणि तिचे फोटो उघड केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अभिनेता सलमान खान, अक्षय कुमार यांच्यासह तब्बल ३८ सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल झाला आहे.
बलात्कार पीडितेची ओळख किंवा तिचा फोटो उघड करणं हा कायद्याने गुन्हा आहे. अनेक सेलिब्रिटींनी या पीडितेची ओळख उघड केली त्यांमुळे दिल्लीतील वकील गौरव गुलाटी यांनी या सेलिब्रिटींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीतील सब्जी मंडी पोलीस ठाण्यात याविषयी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 228A अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.” सर्वसामान्यांसमोर आदर्श उदाहरण निर्माण करण्याऐवजी हे सेलिब्रिटी नियम मोडत आहेत. त्यामुळे संबंधित सेलिब्रिटींना अटक करण्यात यावी, अशी मागणी तक्रारकर्त्याने केली आहे.
बॉलिवूड कलाकरां व्यतिरिक्त या सेलिब्रिटींमध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील काही कलाकारांचा देखील समावेश आहे. कायद्यानुसार कोणत्याही बलात्कार पीडितेचं नाव, छायाचित्र किंवा खरी ओळख कुठेही उघड करणं हा गुन्हा आहे.
या सेलिब्रिटींवर दाखल झाला गुन्हा
सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण, रकुलप्रीत सिंह, फरहान अख्तर,अनुपम खेर, फरहान अख्तर, रवी तेजा, अल्लु सीरिश, चार्मी कौर यांच्यासह सेलिब्रिटींचाही यात समावेश आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/