12 आमदारांच्या नियुक्तीबाबत आज मोठा निर्णय

Connect With Us

मुंबई : महाविकास आघाडीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने विधानपरिषदेतील 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीबाबत 6 नोव्हेंबर 2020 रोजी 12 नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली होती. त्यात राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांच्या नावाचा तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसैन आणि अनिरूद्ध वनकर आणि शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानुगडे पाटील यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.

मात्र जवळपास 9 महिने झाले तरीही त्यााबाबतचा निर्णय न झाल्याने हा वाद कोर्टात पोहोचला आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून,  विधानपरिषदेतील 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीबाबत आज मुंबई हायकोर्ट आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्य सरकारनं पाठवेल्या प्रस्तावावर उत्तर देण्यास राज्यपाल बांधील नाहीत, असा दावा केंद्राने केला आहे. त्यावर अशा परिस्थितीत तोडगा काय असा सवाल हायकोर्टाने विचारला होता. त्यानंतर आता आज या प्रकरणाचा निर्णय अपेक्षित आहे.

आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us