दिवाळीनंतर शाळा नियमितपणे सुरु करण्याबद्दल महापौरांनी दिली महत्वाची माहिती
मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या राज्यातील शाळा नियमितपणे सुरु करण्याच्या या निर्णयासंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शाळा सुरु करण्याचा निर्णय हा दिवाळीनंतर राज्यात जी स्थिती असेल त्यावर अवलंबून आहे”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, गेल्या वर्षी देखील राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला पण मुंबईत तशी स्थिती नव्हती. त्यामुळे, शाळा सुरु करण्याचा निर्णय हा दिवाळीनंतर जी स्थिती असेल त्यावर अवलंबून आहे. आजही लहान मुलांचं लसीकरण पूर्ण झालेलं नाही.
त्यामुळे, हा निर्णय ही खूप मोठी रिस्क असेल. त्याचप्रमाणे, ८० ते ९० टक्के पालकवर्गाचं असं म्हणणं आहे की इतकी मोठी रिस्क आम्ही घेणार नाही. म्हणूनच, त्यावेळची स्थिती जशी असेल त्यावरून महानगरपालिका शहरातील शाळा सुरु करण्याबाबतचा विचार करेल.” त्यामुळे, निश्चितच दिवाळीनंतर करोना नियंत्रणात असेल तर नियमित शाळा सुरु करण्यास कोणतीही हरकत नसेल असं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, दिवाळीनंतर शाळा नियमितपणे सुरु होणार असल्याचं म्हटलं जात आहे. गणेशोत्सवानंतरच्या २० दिवसांमधली राज्यातील करोनास्थिती पाहून तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन शाळांबाबतचा निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्याच्या कोविड टास्क फोर्सने दिल्या आहेत.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/