पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा राजीनामा
पंजाब : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला आहे.अमरिंदर सिंग यांच्यासोबत २० आमदार आणि पंजाबचे काँग्रेसचे काही खासदार राजभवनला उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टन अमरिंदर सिंग हे काँग्रेसच्या हायकमांडवर नाराज आहेत. आगामी काळात काँग्रेसला त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमरिंदर सिंह यांनी राजकीय पंजाबच्या राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. अमरिंदर सिंह राजीनामा देणार असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. अमरिंदर सिंह यांनी राजनामा देणार नसल्याचे सांगितले होते. परंतु त्यांनी आता राजभवनावर जाऊन राज्यपालांकडा राजीनामा दिला आहे. अमरिंदर सिहं यांच्यासोबत त्यांचा मुलगाही उपस्थित होता.
कॅप्टन आणि त्यांचे कट्टर विरोधी नवजोत सिंह सिद्धू यांच्यातील राजकीय युद्ध संपू शकले नाही. त्यामुळे आता अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला आहे. ४८ नाराज आमदारांनी पक्षाच्या हायकमांडला पत्र लिहिल्यानंतर काँग्रेसने विधिमंडळ बैठक बोलावली आहे. या बैठकीपुर्वीच अमरिंदर सिंह यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंद सिंह राजीनामा देणार असल्याची माहिती त्यांच्या मुलाने राज्यपालांकडे जाण्यापुर्वीच दिली होती.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/