चाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान! सातशे ते आठशे जनावरे वाहून गेले
चाळीसगाव जि.जळगाव : चाळीसगाव तालुक्यात शहर व ग्रामीण भागात मंगळवारपासून सुरु झालेल्या पावसाची संततधार कायम राहिल्याने बुधवारी पहाटे डोंगरी व तितूर या नद्यांना मोठा पूर आला. शहराच्या दक्षिणेला असणा-या वाघडू, वाकडी, रोकडे, वाघले, बाणगाव येथे गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. मध्यरात्री व पहाटे पूर आल्याने पशुधनाचे नुकसान झाले आहे. अनेक जनावरे दगावली आहेत.
तालुक्यातील १४ मध्यम जल प्रकल्पांपैकी १० धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. शहरात बामोशी बाबा दर्गाह परिसरासह, मुख्य बाजार पेठ, दोस्त टाॕकीज परिसर जलमय झाला आहे.
मध्य रात्रीच्या सुमारास झालेले मुसधार पावसाने डोंगरी आणि तीतुर नदीला आलेल्या पुरात सातशे ते आठशे जनावरे आणि पाच ते सात माणसे वाहून गेल्याची तसेच काही लोक वाहून गेल्याची देखील माहिती मिळत आहे. पुरामुळे तालुक्यात मोठं नुकसान झाल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे. तितुर आणि डोंगरी नदीच्या पुराच पाणी पंधरा गावात शिरल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अहाकार उडाला असल्याचं पाहायला मिळाले आहे. रात्रीच्या वेळी घरात पाणी शिरल्याने नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झाले आहे.
अद्यापही चाळीसगाव तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने शहराच्या अनेक भागात आणि अनेक गावात पाणी शिरले असल्याने या ठिकाणचं जनजीवन विस्कळित झाले आहे. चाळीसगाव औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या कन्नड घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळून वाहने अडकून पडल्याने त्यांना मोठ्या अडचणी ना समोर जावे लागत आहे,एक ट्रक दरीत कोसळत त्यात एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आमदार मंगेश चाव्हण यांनी दिली आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/