पुढील 24 तासांत ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून हाय अलर्ट
मुंबई : . राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज उत्तर महाराष्ट्रासह उत्तर कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राज्यात तब्बल चौदा जिल्ह्यांना येलो अलर्ट तर एका जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान खात्यानं आज नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशीम, चंद्रपूर, आणि वर्धा अशा चौदा जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. याठिकाणी पुढील चोवीस तासात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्यानं आज यवतमाळ या एकमेव जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे. याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या राज्यात पावसाचा काहीसा जोर कमी होण्याची शक्यता आहे. उद्या पालघर, नंदूरबार, बुलडाणा, अकोले आणि वाशीम या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. उर्ववरित महाराष्ट्रात उद्या कोरड्या हवामानाची शक्यता आहे.
तसेच, आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. सायंकाळनंतर याठिकाणी पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या राज्यांना हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/