जागतिक आदिवासी दिन
क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ ९ ऑगस्ट हा दिवस राज्यात ‘आदिवासी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. वनसंपदेचे रक्षण करून पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या कामी वनवासींचे मोठे योगदान आहे. हाता-पोटावर काम करून जगणारी ही जमात आहे. त्यांच्याकडे इतर काही उपजिविकेचे साधन नसल्याने ते आर्थिक आणि शैक्षणिक स्तरावर काही प्रमाणात आजही पिछाडीवर असल्याने निदर्शनास येते. या पार्श्वभूमीवर त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास होऊन त्यांचे जीवन सर्व दृष्टीने समृद्ध व्हावे, या उद्देशाने युनो या आंतरराष्ट्रीय संघटनेतर्फे ९ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा केला जातो.
तसेच, आदिवासी-वनवासी यांनी केवळ जंगलाचेच रक्षण केलेले नाही, तर त्यांनी रणांगणावरही शौर्य गाजवले आहे. मेवाडचे महाराजा महाराणा प्रताप यांना संकट समयी मदत करून हळदीघाटच्या युद्धात अकबर बादशाहच्या मोगल सैन्याला जेरीस आणून महाराणा प्रतापांना विजय संपादन करण्यात आदिवासी बांधवांनी मोठं पाठबळ दिलं. या कारणास्तव मेवाडच्या राजचिन्हावर राजपूत सैनिक आणि आदिवासी योद्ध्यांचे कोरीव चित्र आहे. म्हणूनच आदिवासींना काटक आणि लढवैय्यी जमात म्हणतात.
क्रांतीवीर बिरसा मुंडा
आदिवासी जमातीचे खरे भाग्यविधाते भगवान बिरसा मुंडा हे होय. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंड राज्यातल्या रांची जिल्ह्याच्या उलिहातु येथे झाला.आनंद पांड यांना गुरुस्थानी मानून बिरसाने १८९५मध्ये छोटा नागपूर क्षेत्रात इंग्रजांविरूद्ध लढा उभारला.
क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची १९व्या दशकातले ‘जननायक’ म्हणून जनमानसात ख्याती होती.त्यांनी देशातील सर्व मुंडांना संघटित करून इंग्रज सरकारकडे कर माफीसाठी तीव्र आंदोलन केलं. राजद्रोहात्या आरोपाखाली इंग्रज सरकारने ३ मार्च १९९०रोजी चक्रधरपूर येथे बिरसासह अन्य ४६० मुंडांची धरपकड करून त्यांचा अमानुष छळ केला. त्यात बिरसा यांचा ९ जून १९००रोजी रांची येथील कारागृहात मृत्यू झाला. त्यांच्या बलिदानाची भारतीयांना सदैव आठवण रहावी, या उद्देशाने केंद्र सरकारने रांची येथे बिरसा मुंडा केंद्रीय कारागृह आणि बिरसा मुंडा हवाई विमानतळ उभारले. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल केंद्र सरकारने त्यांचे तैलचित्र संसदेमध्ये लावले आहे.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/