आठ लाखांची लाच घेताना शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीरसह दोन जण जाळ्यात
नाशिक : शाळांना मंजूर झालेल्या २०% अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांना लाचप्रकरणात चालक ज्ञानेश्वर येवले आणि शिक्षक पंकज दशपुते यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आठ लाखांची लाच घेताना पकडले आहे.
शिक्षण संस्थेच्या शाळांना 20 टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरु करण्यासाठी एकूण 9 लाख रुपयांची लाच मागितली होती. यात तडजोड करत 8 लाख रुपयांवर देण्याचे मान्य केले. शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली यांनी यासंदर्भात कारचालक येवले यांना भेटण्यास सांगितले. त्यानुसार मंगळवार (दि.10) रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास 8 लाख रुपये स्विकारताना येवले यास ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कोणतीही माहिती न देता ठाणे जिल्ह्यातील पथकाने ही कारवाई केल्याने झनकर यांच्या कारभार समोर आला आहे. पथकाने संपूर्ण कारभाराचीच सविस्तर चौकशी करावी, अशी मागणी शिक्षण संस्था चालकांकडून होत आहे.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/