खोक्याला व्हिआयपी ट्रिटमेंट, ”त्या” दोन पोलिसांचे निलंबन
सतीश भोसले उर्फ खोक्याला शिरूर न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान, बीडच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहा बाहेर सतीश भोसले उर्फ खोक्या याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. कारागृहाबाहेर मित्र, कुटुंबीयांसोबत घरच्या जेवणावर आडवा हात मारणाऱ्या खोक्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. पोलिसांवर टीकास्त्र सुरू होताच, जिल्हा पोलीस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले. त्यांनी या प्रकरणात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
दरम्यान, यात आणखी अधिकारी कर्मचारी दोषी असल्यास त्यांच्या विरोधात देखील कारवाईचा इशारा वरिष्ठ पोलिसांनी दिला आहे.