वेदनादायी! 16 कोटींच्या इंजेक्शन नंतरही वेदिकाची मृत्यूशी झुंज अपयशी
मुंबई : स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी या आजाराशी लढणाऱ्या 11 महिन्यांच्या वेदिका शिंदेचं रविवारी (1 ऑगस्ट) निधन झालं. दीड महिन्यांपूर्वीच वेदिकाला उपचारासाठी आवश्यक असलेलं 16 कोटी रुपयांचे इंजेक्शन देण्यात आलं. फेब्रुवारीच्या अखेरीस वेदिकाला SMA चं निदान झालं होतं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. दीड महिन्यांपूर्वी उपचारासाठी आवश्यक इंजेक्शन दिल्यानंतर, तेव्हापासून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत होती.
या चिमुकलीच्या उपचारासाठी देशभरात लोकवर्गणीतून निधी उभारण्यात आला. हे अमेरिकेतून इंजेक्शन मागवण्यात आलं. तसंच यावरील आयात शुल्क केंद्र सरकारनं माफ केलं होतं. वेदिकाच्या उपचारांसाठी तिच्या आई बाबांनी Vedikafightssma असं सोशल मीडिया पेज फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामला सुरू केलं होतं.
vedikafightssma या फेसबुक पेजवर वेदिकाच्या पालकांनी रविवारी (1 ऑगस्ट) दुपारी साधारण दोन वाजता केलेली पोस्ट वेदिकाची अखेरची पोस्ट ठरली. वेदिकाच्या प्रकृतीत सुधारणा कशी होत आहे याविषयीची माहिती यात देण्यात आली. पण अवघ्या काही तासांत साधारण संध्याकाळी पाच वाजता वेदिकाने अखेरचा श्वास घेतला.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7