अभिमानास्पद ! महाराष्ट्राच्या सुपुत्राची हवाई दलाच्या प्रमुख पदी निवड
हवाई दलाच्या प्रमुख पदी महाराष्ट्रचे सुपुत्र व्ही. आर. चौधरी (VR Chaudhari) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया निवृत्त झाल्याने व्ही. आर. चौधरी यांना या पदावर नियुक्ती मिळाली आहे. चौधरी यांनी जुलै महिन्यात हवाई दलाच्या उपप्रमुख पदाचा कार्यभार स्विकारला होता. यापुर्वी ते भारतीय दलाच्या वेस्टर्न कमांडचे कमांडर इन चिफ होते. व्ही. आर. चौधरी महाराष्ट्रातील नांदेडचे रहिवाशी आहेत.
तीन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी हवाई दलाच्या वेगवेगळ्या विभागांत काम केले आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी मिग-२१, मिग एमएफ आणि सुखोई एमकेआय या ही लढाऊ विमानं उडवत ३,८०० पेक्षा जास्त तासांचा विमान चालवण्याचा अनुभव घेतला आहे. एअर मार्शल चौधरी यांचा २ डिसेंबर १९८२ मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विभागात समावेश करण्यात आला होता. एअर मार्शल चौधरी यांना आतापर्यंत सेवेदरम्यान परम विशिष्ठ सेवा पदक, अति विशिष्ठ सेवा पदक आणि वायु सेना पदक देण्यात आले आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/