संयुक्त राष्ट्र परिषदेत अफगाणिस्तानवर ठराव मंजूर

Connect With Us

अफगाणिस्थावर तालिबानने कब्जा मिळवला आहे. त्यानंतर तिथे अनेक घडामोडी झालेल्या पहायला मिळाले. तालिबानने  अफगाणिस्थानवर कब्जा मिळविल्यावर इतर देशांनी यावर काही निर्णय घेण्याचे ठरविले.  दरम्यान, संयुक्त राष्ट्र परिषदेत अफगाणिस्तावर ठराव मंजूर करण्यात आला आहे. परिषदेत १३ सदस्य देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. UNSC बैठकीत अध्यक्ष पराराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला होते. मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानचा वापर कोणत्याही देशाला धमकी देण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी किंवा दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी केला जाऊ नये त्याचप्रमाणे दहशतवाद्यांना शिवण्यासाठी किंवा योजना तयार करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केला जाऊ नये अशी भारताची भूमिका होती. या ठरावातील हा मुख्य प्रस्ताव असल्याचे सांगण्यात येत आहे.

परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी यावेळी म्हटले की, अफगाणिस्तानवरील आजच्या ठारावामध्ये NISC 1267 दहशवादी आणि घटकांनी रुपरेषा आहे. जी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगतले. तालिबान अफगाणिस्तानचा वापर कोणत्याही देशाचा धमकावण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी करु शकतो त्यामुळे सावध रहा, असे ते म्हणाले.

तर अमेरिका, ब्रिटेन आणि फ्रान्सने मांडलेल्या ठरावात अफगाणिस्तानचा भूभाग कोणत्याही देशाला धमकी देण्यासाठी किंवा ह्ल्ला करण्यासाठी वापरला जाऊ नये अशी मागणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानने २७ ऑगस्ट रोजी केलेल्या वक्तव्याची या ठरावात प्रामुख्याने नोंद करण्यात आली असून अफगाणिस्तानमधून अफगाण आणि सर्व परदेशी नागरिकांच्या सुरक्षा आणि सुव्यवस्थित निर्वासनासह तालिबानने आपल्या दिलेल्या शब्दाचे पालन करावे अशी सुरक्षा परिषदेशी अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 


Connect With Us