राहुल गांधींसह काँग्रेसच्या ५ नेत्यांचे ट्विटर अकाऊंट लॉक
नवी दिल्ली : ट्विटरने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं खातं तात्पुरतं लॉक केलं होतं. राहुल गांधी यांनी दिल्लीमधील नऊ वर्षीय बलात्कार पीडितेच्या कुटुंबासोबतचा फोटो ट्विटर वर प्रसारित केल्यामुळे कारवाई करण्यात आली होती. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला नोटीस पाठत बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करणारे ट्विट हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता राहुल गांधी यांचे ट्विटर खाते तात्पुरते निलंबित करण्यात आले असताना, काँग्रेसने बुधवारी दावा केला की रणदीप सुरजेवाला यांच्यासह पाच वरिष्ठ नेत्यांच्या अकाऊंटवर अशीच कारवाई करण्यात आली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, लोकसभेतील पक्षाचे व्हीप माणिकम टागोर, आसाम प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आली आहेत असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आलं आहे.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/