Tokyo2020 : हॉकी संघातील पंजाबच्या खेळाडूंना मिळणार प्रत्येकी १ कोटी

Connect With Us

नवी दिल्ली : भारतीय पुरुष हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीविरुद्ध कांस्यपदक जिंकून ४१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने प्ले-ऑफ सामन्यात जर्मनीचा ५-४ असा पराभव केला. सिमरनजीत सिंगच्या दोन गोलमुळे भारताला हा थरारक सामना जिंकता आला.देशाचा राष्ट्रीय खेळ असल्याने हा विजय सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे.

त्यामुळे हा अनमोल विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंवरही कौतुकांचा वर्षाव होत असतानाच पंजाब सरकारने हॉकी संघात खेळणाऱ्या त्यांच्या राज्यातील खेळाडूंना तब्बल 1 कोटी रुपयांचं रोख बक्षिस जाहिरं केलं आहे.

पंजाबचे क्रिडा मंत्री राणा गुरमीत सोढी यांनी ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, ”सर्वच हॉकी संघाचं अभिनंदन! आता हा विजय साजरा करण्याची वेळ आली आहे. पंजाबचा क्रिडामंत्री म्हणून राज्यातील खेळाडूंना आणखी प्रेरणा मिळावी म्हणून मी हॉकी संघातील पंजाबच्या खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपयांचं बक्षिस जाहीर करतो.


Connect With Us