tokyo2020 : हॉकी संघाला पंतप्रधान मोदींनी केला फोन, म्हणाले…

Connect With Us

नवी दिल्ली : तब्बल ४१ वर्षांनंतर भारताची हॉकीमधली पदकाची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. भारतीय पुरुष संघाने जर्मनीवर मात करत कांस्य पदक मिळवले. यापुर्वी मॉस्कोमध्ये १९८० साली भारताने पदक जिंकलं होतं. भारतीय संघाचे हे यश आज अवघा देश साजरं करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयी संघाला स्वत: फोन करुन त्यांच्याशी बातचीत केली आणि त्यांचं प्रचंड कौतुक केलं.

“मनप्रीत खूप खूप शुभेच्छा. तू आणि तुझ्या संघांनं जे काही केलं आहे, त्यामुळे संपूर्ण देश आज आनंदाने नाचत आहे. संपूर्ण संघाने खूप मेहनत केली. माझ्याकडून संपूर्ण संघाला शुभेच्छा. आज संपूर्ण देशाला तुमचा गर्व वाटत आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनप्रीतला सांगितलं. त्यानंतर त्यांनी प्रशिक्षक ग्राहम रीड याच्याशी संवाद साधला.

काय म्हणाले पंतप्रधान…

मनप्रीत सिंह– नमस्कार सर

पंतप्रधान मोदी– मनप्रीत जी, खूप खूप शुभेच्छा, संपूर्ण संघाने मोठी कामगिरी केली आहे.

मनप्रीत सिंह– धन्यवाद सर

पंतप्रधान मोदी– संपूर्ण देश नाचत आहे.

मनप्रीत सिंह– धन्यवाद सर, आपण दिलेले आशीर्वाद आमच्यासोबत आहेत.

पंतप्रधान मोदी– त्या दिवशी आवाज कमी होता. आज आवाजात दम दिसतोय.

मनप्रीत सिंह– सर, तुम्ही दिलेली प्रेरणा संघाला कामी आली.

पंतप्रधान मोदी– नाही, नाही. आपण केलेल्या मेहनतीचं फळ आहे. पीयूषजीने सुद्धा आपल्यासोबत खूप मेहनत केली. माझ्याकडून खेळाडूंना शुभेच्छा दे. आपण १५ ऑगस्टला भेटतोय, मी तुम्हा सर्वांना तिथे बोलवलं आहे.

मनप्रीत सिंह– धन्यवाद सर


Connect With Us