टोकियो ऑलिम्पिक : ”मी देशाची माफी मागते” बॉक्सर मेरी कोमचे भावनिक उद्गार
नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सर मेरी कॉमसोबत झालेल्या दगाफटक्यामुळे तिला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. मेरी कोमच्या सामन्याबद्दल जागतिक पातळीवर शंका उपस्थित होत आहे. मेरी कोमने विजय झाल्याचे मानत हात वर केला होता, पण अंपायरांच्या निर्णयामुळे तिला धक्का बसला. मॅचनंतर मेरी कोमने अंपायरांचा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले होते.
त्यानंतर, आज दिल्ली विमानतळावर आगमन झाल्यानंतर पत्रकारांनी तिला घेरले. त्यावेळी, मेरी कोमने विनम्रपणे देशाची माफी मागत असल्याचं म्हटलं. मात्र, ऑलिंपिंक स्पर्धेत अपील नसल्याने तोच निर्णय अंतिम असतो. विना मेडल जिंकता परत येणं मला अतिशय वाईट वाटतंय. दोन राऊंड सहजपणे जिंकल्यानंतर पराभूतच कशी होऊ शकते, रिकाम्या हातीने आल्याबद्दल मी देशावासीयांची माफी मागते, मेरीने म्हटले आहे.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7