UIDAI ची माहिती; Aadhaar कार्ड अपडेट करण्यासाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक

Connect With Us

UIDAI ची माहिती

नवी दिल्ली : आधार कार्डधारकांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे.जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये काहीतरी अपडेट करायचं असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी गरजेची आहे. सध्या सर्वत्र आधार कार्डचा वापर केला जातो, त्यामुळे चुकीची जन्मतारीख किंवा चुकीचा पत्ता तुम्हाला अडचण निर्माण करू शकतो, त्यामुळे तुमच्या आधार कार्डमध्ये काही गडबड असेल तर ती दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे.

आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI ने आपल्या ट्विटमध्ये याबाबत माहिती दिली आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुमचे डॉक्युमेंट्स तुमच्या नावे असणं आणि ते वॅलिड असणं गरजेचं आहे.

‘ही’ कागदपत्रे स्वीकारली जातात
यूआयडीएआयच्या म्हणण्यानुसार, आधार कार्डमध्ये ओळखीच्या पुराव्यासाठी (Proof Of Identity ) ३२ कागदपत्रे स्वीकारली जातात. नातेवाईकांच्या पुराव्यासाठी (Proof Of relationship) १४ कागदपत्रे, जन्म तारखेच्या पुराव्यासाठी (DOB) १५ आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी (Proof of Address (PoA)) ४५ कागदपत्रे स्वीकारली जातात.

Proof Of Relationship
1. मनरेगा जॉब कार्ड
2. पेन्शन कार्ड
3. पासपोर्ट
4. आर्मी कॅन्टीन कार्ड

DOB Documnets
1. जन्म प्रमाणपत्र
2. पासपोर्ट
3. पॅन कार्ड
4. मार्क शीट्स
5. एसएसएलसी बुक/प्रमाणपत्र

Proof Of Identity (PoI)
1. पासपोर्ट
2. पॅन कार्ड
3. रेशन कार्ड
4. मतदार ओळखपत्र
5. ड्रायव्हिंग लायसन्स

Proof of Address (PoA)
1. पासपोर्ट
2. बँक निवेदन
3. पासबुक
4. रेशन कार्ड
5. पोस्ट ऑफिस अकाऊंट स्टेटमेंट
6. मतदार ओळखपत्र
7. ड्रायव्हिंग लायसन्स
8. वीज बिल
9. पाणी बिल

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 


Connect With Us