राष्ट्रध्वज फडकवण्याचे ‘हे’ आहेत नियम

Connect With Us

भारतीय ध्वज संहितेनुसार तिरंगा फडकावण्याचे नियम निर्धारीत केले आहे. यानुसार एखाद्याने चुकीच्या पध्दतीने तिरंगा फडकावल्यास त्याला कारावास आणि दंडही होऊ शकतो.

१) राष्ट्रीय ध्वजाचे स्थान हे सर्वोच्च असते.राष्ट्रध्वजापेक्षा अधिक उंचीवर दुसरा झेंडा फडकवू नये. झेंड्यावर कोणतीही वस्तू, चिन्ह, फुल, हार ठेवू नयेत. पण राष्ट्रीय उत्सवांच्या दिवशी ध्वजवंदनापूर्वी झेंड्यात फुले ठेवण्यास परवानगी आहे.

२ तिरंगा नेहमी सुती, रेशीम किंवा खादीपासून बनलेला असावा. तसेच ३:२ या गुणोत्तरात आयताकृती आकाराचा असला पाहिजे. अशोकचक्रात २४ आरे असणेही आवश्यक आहे.

३ ) राष्ट्रध्वज गाड्या, होड्या, विमाने यांच्या टपावर किंवा पाठीमागे तो बांधू नये.

४) ध्वजावर काहीही लिहिणे बेकायदेशीर आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत ध्वजाचा जमिनीला स्पर्श होता कामा नये. लोकांना घरात आणि कार्यालयात सामान्य दिवशी तिरंगा फडकावण्याची अनुमती २२ डिसेंबर २००२ नंतर देण्यात आली.

५) राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.
फडकविलेला तिरंगा त्याच स्थितीत कायम राहायला हवा. फाटलेला, मळलेला वा चुरगळलेला तिरंगा फडकवू नये.

६)  सूर्योदयापासून ते सूर्यास्तादरम्यान तिरंगा फडकविता येतो. झेंडा अर्ध्यावर ठेवून फडकवू नये. काही प्रसंगी सरकारी आदेश असल्याशिवाय सरकारी इमारतीवरील तिरंगा अर्ध्यावर आणण्यास मनाई आहे.

७). तिरंगा एखाद्या मंचावर फडकवला असल्यास, वक्ता भाषण करत असताना तिरंगा त्याच्या उजवीकडे असणे आवश्यक आहे.

८) विशेष प्रसंगी झेेंडा रात्री फडकवला जातो.


Connect With Us