“जोपर्यंत कोरोना कमी होणार नाही तोपर्यंत साहित्य संमेलन होणार नाही”
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा निर्णय ; “जोपर्यंत कोरोना कमी होणार नाही तोपर्यंत साहित्य संमेलन नाही,”
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार होते. मात्र, कोरोनामुळे साहित्य संमेलन स्थगित करण्यात आले होते . त्यानंतर आता कोरोनाची दुसरी लाट सरल्यामुळे संमेलन आयोजित करण्याविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. याबाबत मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी अधिक माहिती दिलीय.
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होणार आहे. मात्र, कोरोना साथीमुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे. “नाशिक साहित्य संमेलन स्वागत मंडळ आणि साहित्य मंडळ सदस्य चर्चा करण्यासाठी आले आहेत. संमेलन व्हायला पाहिजे अशी लोकांची इच्छा आहे. लोकांचा मान राखून साहित्य संमेलन झाले पाहिजे. मात्र, जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही. तसेच सरकार परवानगी देत नाही तोपर्यंत संमेलन आयोजित करता येणार नाही. जोपर्यंत कोरोना कमी होणार नाही तोपर्यंत साहित्य संमेलन होणार नाही,” असे ठाले पाटील म्हणाले.
तसेच कोरोनास्थितीमुळे सध्या बहुतेक सार्वजनिक कार्यक्रम हे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. मात्र ऑनलाईन साहित्य संमेलन आयोजित केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलय.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7