धक्कादायक ! पतंगाच्या मांजाने तरुणाचा गळा कापला, तब्बल 9 टाके पडले
उद्या मकरसंक्रांत सन मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. मकर संक्रांतीच्या महिनाभराआधी पासूनच लहान मुलांपासून मोठ्यांमध्येही पतंग उडवण्याचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. याच पतंगाच्या मांज्यामुळे अनेक दुर्घटनाही होताता दिसत आहेत.
पतंगाच्या मांज्याने एका इसमाचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना वसईत घडली आहे. रविवार असल्याने आपला दहा वर्षाचा मुलगा आणि पत्नीसह बाईकवरुन फिरण्यासाठी जात असताना, एका पतंगाचा मांजा गळ्यात अडकला आणि गळ्यावर खोल जखम झाली. त्याला 9 टाके पडले आहेत. सुदैवाने बाईकवरून पडून वगैरे जास्त मोठी दुर्घटना झाली नाही, मात्र तरीही गळ्या टाके पडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या वसईच्या समर्थ रामदास नगर येथे राहणारे विक्रम डांगे हे काल रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी त्यांची पत्नी नितल आणि दहा वर्षाचा मुलगा प्रांशू यांच्यासह बाईकने वसईच्या मधुबन परिसरातून फेरफटका मारत होते. त्याचवेळी संध्याकाळी 5.30 च्या दरम्यान मधुबनच्या एका मोकळ्या मैदानात सुरक्षा स्मार्ट सिटी मार्फत पंतग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. विक्रम डांगे हे कुटुंबासह बाईकवरून जात असतानाच एका पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याभोवती आवळला गेला आणि गळ्यावर चिर पडली. चिर एवढी खोल होती की, बराच रक्तस्त्राव झालं, त्यांच्या गळ्याला 9 टाके पडले आहेत. पत्नीने लागलीच मांजा काढल्याने तसेच विक्रम यांचा बाईकचा स्पीड कमी असल्याने मोठी हानी झाली नाही.
दरम्यान, मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा वापरू नये, म्हणून पोलिसांच्या वतीने शहरात ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात आली. आतापर्यंत नायलॉन मांजामुळे सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. नायलॉन मांजा वापरणारे आणि विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला यावेळी दिला आहे. आतापर्यंत 50जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी 6 जणांवर कलम 110अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे.